वृत्त क्र. 154
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईकडे प्रयाण
नांदेड, दि. 6 फेब्रुवारी
:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यानंतर रात्री आठच्या सुमारास नांदेडच्या गुरुगोविंद सिंघजी नांदेड
विमानतळावरून मुंबईसाठी रवाना झालेत. यावेळी त्यांच्यासोबत पाणीपुरवठा व स्वच्छता
मंत्री गुलाबराव पाटील होते.
विमानतळावर त्यांना बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ.
हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. आनंद पाटील बोंढारकर, आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी निरोप
दिला.
0000

.jpeg)


No comments:
Post a Comment