Tuesday, February 25, 2025

  वृत्त क्रमांक 229

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

नांदेड, दि. 25 :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व जतन व संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअसेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...