वृत्त क्रमांक 227
आता उत्कृष्ट लोकसेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राचा होणार सन्मान
नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवा केंद्रांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घोषित केला आहे यासाठी सर्व सेवा केंद्रांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करण्यासाठी तसेच गावस्तरावरील नागरीकांना स्वतःच्या गावातच आवश्यक असलेली सर्व प्रमाणपत्रे व इतर सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात या हेतूने जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन कर करण्यात आले आहे. या सर्व सेवा केंद्रा मध्ये उत्कृष्ट सेवा देण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
२४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीतील उत्कृष्ट कामाच्यावर आधारित स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील आपले सेवा सरकार केंद्रानी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
हा एक आगळा वेगळा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला आहे. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र हे आदर्श करण्यात येणार आहेत. या कालावधीत जे केंद्र सर्वात जास्त लोकसेवा नागरीकांना देईल व ग्रामपंचायत विभागाचे पत्र २४ फेब्रुवारी २०२५ मध्ये नमुद केलेल्याप्रमाणे सर्व सोई सुविधा आपले सरकार सेवा केंद्रात उपलब्ध करून देईल व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करेल त्या आपले सरकार सेवा केंद्राच्या केंद्रचालक, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार ३ मार्च २०२५ रोजी कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, नांदेड येथे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) मंजुषा जाधव (कापसे) यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हास्तरावर ग्रामपंचायत अधिकारी, केंद्र चालक व विस्तार अधिकारी (पं.) यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत ग्राम विकास विभाग शासन निर्णय २८ जानेवारी २०२५ मध्ये दिलेल्या सुचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावरील “आपले सरकार सेवा केंद्र”यांच्या मार्फत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या ७ सेवांसह इतर विविध प्रशासकीय विभागांनी अधिसूचीत केलेल्या ५३६ ऑनलाईन लोकसेवा नागरीकांना उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धा कालावधीत करावयाची कामे
आपले सरकार सेवा केंद्रासाठी स्वतंत्र कॅबीन असावे. आपले सरकार सेवा केंद्र स्वच्छ व रंगरंगोटी केलेले असावे. ASSK केंद्रात किमान १०० mbps इंटरनेट सुविधा असावी. ASSK केंद्रात संगणक, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, बायोमॅटरीक मशिन, लॅमिनेशन मशिन, तक्रार पेटी, केंद्राचा रबरी शिक्का, पीण्याच्या पाण्याची सुविधा, वेटींग हॉल किंवा रूम, अभिप्राय नोंदवही, इ. सुविधा उपलब्ध असाव्यात. ग्रामपंचायती मार्फत दिल्या जाणा-या सेवा व इतर विभागा मार्फत दिल्या जाना-या सेवा यांचे डिजीटल बोर्ड लावणे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती देणारे डिजीटल / QR कोड असलेले बोर्ड लावण्यात यावेत. “या केंद्रावर विहित कालावधीत सेवा न मिळाल्यास मोफत ऑनलाईन अपील करण्याची सुविधा आहे”असा मजकुर असलेला सुचना फलक तयार करुन लावण्यात यावा. प्रथम अपिलीय प्राधिकारी व व्दितीय अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे बोर्ड लावणे. ASSK केंद्रा मार्फत दिल्या जाना-या प्रमाणपत्रावर आयोगाचा “लोगो” व “आपली सेवा आमचे कर्तव्य” हे ब्रिदवाक्य छापलेले असावे. आपले सरकार सेवा केंद्रातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी Flower Pots ठेवलेले असावेत. आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामपंचायत स्तरावरील ७ सेवा व इतर विभागांच्या अधिसुचीत (५३६ सेवा) ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणे. (नागरीकांना सर्वात जास्त सेवा उपलब्ध करून देवून जास्तीत जास्त महसुल जमा करणे) इ.
प्रत्येक तालुक्यातुन चांगले काम करणाऱ्या एका आपले सरकार सेवा केंद्रास ३ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद स्तरावर उपरोक्त नमुद मुद्याच्या अनुषंगाने सादरीकरण करण्याची संधी देण्यात येईल. परिक्षकांनी निवड केलेल्या गावातील एका आपले सरकार सेवा केंद्रास जिल्हयातील उत्कृष्ट आपले सरकार सेवा केंद्र म्हणून गौरविण्यात येईल.
000000
No comments:
Post a Comment