केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 21 फेब्रुवारी :- केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2024-25 अंतर्गत गट अ व गट क मधील वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 5 मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 गट-अ अंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजना व क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना करीता हे अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ठ टिएसपी, ओटीएसपी क्षेत्रातील लाभार्थी यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 करीता निधी उपलब्ध होण्याच्या अधिन राहून पुढील योजनेकरीता अर्ज मागविण्यात आली आहेत.
अ-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना
· शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपन अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वन्य जीवापासुन शेतीचे संरक्षण करण्यासाठी तारकुंपनासाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतीमध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतामध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ठिबक सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· 100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट (3 शेळी व 1 बोकड) खरेदी.
· 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).
· अदिम (कोलाम) जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना विविध व्यवसाय करणे करीता 100 टक्के अर्थसहाय्य देणे (डीबीटीद्वारे).
· अदिम (कोलाम) जमातीच्या महिला बचत गटास मंगल कार्याकरीता लागणारे (मंडप संच व भांडी व संबधित साहित्य) भाडयाने देणे हा व्यवसाय करणे करिता 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.
· 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचत गटास मंगल कार्या करीता लागणारे साहित्य (मंडप संच व मांडी व संबंधित साहित्य) भाडयाने देणे हा करणे करीता अर्थसहाय्य डीबीटीद्वारे.
· 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटांना दालमिल स्थापन करणे करीता अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.
· 85 टक्के अनुदानावर आदिवासी सुशिक्षित युवकांच्या समुहांना-युवतीच्या समुहांना-बचतगटांना संगणक संच, प्रिंटर, युपीएस व तत्सम साहित्य घेऊन सेतु केंद्र लावण्यासाठी अर्थ सहाय करणे.
· आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्याकरीता अर्थसहाय्य करणे (नळ फिटींग, इलेक्ट्रीकल, अॅटोमोबाईल, सुतारकाम व इतर पावसाय).
या योजनांचे अर्ज, आवेदन पत्र परिपुर्ण भरून 5 मार्च 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे सादर करावीत. अर्जासोबत, अर्दादाराचे पासपोर्ट साईज फोटो, अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे खाते, रहिवासी, प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतीविषयक योजने करीता सात/बारा, सिंचन विषयक योजनेकरीता शेतात पाणी उपलब्ध असल्याचे तलाठी यांचे प्रमाणपत्र, आधार लिंक असलेले मोबाईल क्र., बचत गटाच्या योजना करीता बचतगट नोंदणी प्रमाणपत्र व अर्जा सोबत, अर्दाराराचे पासपोर्ट साईज फोटो, सर्व सदस्याचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बचतगटाचे बँकेचे खाते, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक, अद्यावत केलेले राशन कार्ड 12 अंकी क्रमांकाचे व शासन वेळोवेळी विहित करतील असे कागदपत्र
क गट- मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना
वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी डी.बी.टी. व्दारे अर्थसहाय्य करणे. या योजनेकरीता अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो, अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे खाते, रहिवासी, प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व शिक्षण घेत असल्याबाबत कॉलेजचे प्रमाणपत्र/गुणपत्रक, अर्जामध्ये नमुद करण्यात आलेली माहितीसह अर्ज सादर करण्यात यावेत, विहित नमुन्यातील कोरे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. सर्व अनुसूचित जमातीच्या सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment