वृत्त क्र. 1076
मतदान वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसोबत मनपा आयुक्तांची सहविचारसभा
हॉटेल व्यावसायिकांकडून अनेक सूट देण्याच्या घोषणा
नांदेड दि. 13 नोव्हेंबर :- ज्येष्ठ नागरिकांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या घरासोबतच गल्ली व चौकांमध्ये याबाबत स्वयंप्रेरणने प्रचार करावा. सामान्य नागरिकांना यासाठी प्रेरित करावे. तसेच व्यावसायिकांनी आपल्या सोबत कार्यरत असणाऱ्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवत येत आहेत. याअंतर्गत आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त तथा स्विपचे अतिरिक्त नोडल अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त अजितपालसिंग संधू हे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी हॉटेल व्यवसायिकांची बैठकही घेण्यात आली. मतदान केलेल्या मतदारांना मतदान केल्याचे बोट दाखवल्यास 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेत पूजा हॉटेल, हॉटेल आशियाना, हॉटेल चांदपाशा कुरेशी, न्यू कुरेशी हॉटेल आणि आकृती हॉटेल यांचा सहभाग आहे.
या बैठकीत ज्येष्ठ नागरिक सदाशिव चिद्रावार, गंगाराम मच्छेवार, मनोहर सुरकुटवार, चंद्रकांत अंकमवर, चंदा हळदे, विजया विष्णुपुरीकर, विजया भुसारे, डॉ निर्मल कोरे यांच्या सह क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व स्वीपचे सदस्य यांची उपस्थिती होती. या उपक्रमाद्वारे मतदानाविषयी जनजागृती वाढवून मतदारांनी मतदान करावे या संदर्भातली जनजागृती करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment