वृत्त क्र. 1009
बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 30 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांची अर्ज सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
नियमित शुल्क मुदतवाढ तारखा व विलंब शुल्क तारखा तसेच शुल्क, कागदपत्रे जमा करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/एनइएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट बुधवार 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करावयाची आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज नियमित शुल्कासह 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत तर विलंब शुल्कासह 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईल मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/ प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इयत्ता बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटद्वारे प्राप्त ऑनलाइन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस/एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया/एचडीएफसी बँक/Axis बॅकच्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व अर्जाचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने अर्ज सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील, असेही राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment