वृत्त क्र. 930
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन
नांदेड, दि. 11 ऑक्टोंबर:- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विमानतळावर माजी
मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक
अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग
बोरगांवकर आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात
आली.
00000
No comments:
Post a Comment