Saturday, October 19, 2024

वृत्त क्र. 961 October 19, 2024

 नांदेड क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

#नांदेड दि. १९ ऑक्टोबर :- नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलामध्ये आजपासून राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला.नांदेडच्या जिल्हा क्रीडा संकुलात या संदर्भातील अद्यावत सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून जिल्ह्याच्या यजमानपदामध्ये आज याचा प्रारंभ झाला.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा आर्चरी (धनुर्विद्या )असोसिएशन यांचे सहकार्याने चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी 14,17,19 वर्षे मुले-मुली . क्रीडा स्पर्धेचे आयोजन 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, नांदेड येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज दि. 19 ऑक्टोंबर,2024 रोजी सकाळी 10.00 वा आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. महेशकुमार डोईफोडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन विजय संतान (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग व प्राचार्य,आर्चरी प्रबोधिनी, मिशन लक्षवेध, महाराष्ट्र राज्य), संतोष झगडे (अधीक्षक, एक्साईज विभाग, छ.संभाजीनगर),जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड), प्रमोद चांदुरकर (सचिव, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन), श्रीमती वृषाली पाटील जोगदंड (सचिव, नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन), श्रीनिवास भुसेवार (आर्चरी संघटना प्रतिनिधी) श्रीमती लता उमरेकर (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू (दिव्यांग), अनूराग कमल, भारतीय आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक मेजर चंद्रकांत ईलग (बुलढाणा), प्रवीण सावंत (सातारा),अभिजीत दळवी (अहमदनगर), कुनाल ठावरे (पिंपरी चिंचवड), दिपक चिकणे (सोलापूर), अमर जाधव, क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक, अमरावती, पवन तोबट (अमरावती), प्रफुल्ल डांगे क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक, अमरावती,रंजीत चामले (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक), मा. डॉ. शुभांगी अभिजीत दळवी (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा अधिकारी- अहमदनगर) व आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू ज्ञानेश बालाजी चेरले-(नांदेड), सरदार तेजविंदरसिंघ जहागीरदार (नांदेड), शर्वरी शंडे (पुणे), मानव जाधव-(अमरावती), प्रितीका प्रदीप, आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू, वैष्णवी पवार- (लातूर), साईराज हालमे- (सोलापूर), वैष्णवी पाटील (आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू), बालाजी पाटील जोगदंड (संघटना प्रतिनिधी) आदि मान्यवर उपस्थित होते. स्वीप कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रमाच्या सुरुवातीस 18 वर्षे पुर्ण झालेल्या सर्व खेळाडूंना व नविन मतदाराना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली.
उदघाटन कार्यक्रम प्रसंगी महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, शालेय जिवनात खेळ हा अतिशय महत्वाचा घटक असुन खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन आपले करीयर घडवावे असे सांगीतले. क्रीडा विषयक बाबीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास महानगरपालिकेच्या वतीने भरभरुन सहकार्य करण्यात येईल असे सांगीतले. तसेच विजय संतान (उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग व प्राचार्य,आर्चरी प्रबोधिनी, मिशन लक्षवेध, महाराष्ट्र राज्य), यांनी म्हणाले की, मिशन लक्षवेध कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना शासनामार्फत विविध क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगीतले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीकात जयकुमार टेंभरे यांनी सांगीतले की, या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातून खेळाडू मुले-मुली मोठयाप्रमाण सहभागी झाले असून यामध्ये निवडलेले खेळाडू नाडीयाड खेडा, गुजरात येथे माहे नोव्हेंबर, 2024 मध्ये संपन्न होणा-या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे सांगीतले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) यांनी केले.
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन), क्रीडा अधिकारी श्री. संजय बेतीवार, श्री. राहुल श्रीरामवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे व आर्चरी असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहेत.
सदर स्पर्धा श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम,नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
--------










No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...