वृत्त क्र. 854
ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक
नांदेड दि. 20 सप्टेंबर :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment