Friday, September 20, 2024

 वृत्त क्र. 855 

जिल्ह्यात "हरित ऊर्जा सौर क्रांतीमोहीम  

 

·  5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून होणार विकसित 

 

नांदेड दि. 20 सप्टेंबर : "हरित ऊर्जा सौर क्रांती" अंतर्गत जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार आहे. अशा गावाला केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात "हरित ऊर्जा सौर क्रांतीमोहीम सुरु करून ही चळवळ यशस्वी करण्यासाठी MNRE ने OM दिनांक 9 ऑगस्ट 2024 नुसार "मॉडेल सोलर व्हिलेजमार्गदर्शक तत्त्वे निर्गमीत केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून गाव विकसित केले जाणार आहे.

 

एक गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित करण्याबाबत एमएसईडीसीसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्रा यांनी सूचित केले आहे. या योजनेबद्दल जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये माहिती देऊन अधिकाधिक गावांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील गावांना ओळखून सदर गावे पीएम-सूर्य: मुफ्त बिजली योजनेसाठी हरित आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडे पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सदर मोहीम सुरू करून "हरित ऊर्जा सौर क्रांतीचळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्हा परिषदेला निर्देश दिले आहेत. 

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1060 राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 7 ते 9 नोव्हेंबर ...