Monday, September 16, 2024

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात सहा लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र 

            मुंबईदि. १६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी  ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.

        राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१पुणे विभागात ९१ हजार ६२५अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत.

            ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्रयोगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून  हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतीलत्यामध्ये चष्माश्रवणयंत्रट्रायपॉडस्टिक व्हीलचेअरफोल्डिंग वॉकरकमोड खुर्चीनी-ब्रेसलंबर बेल्टसर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्रमनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

******

शैलजा पाटील/विसंअ/

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...