बातमी क्र. 723
सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा
· नांदेडमध्ये “हर घर तिरंगा” अभियानाला उत्स्फूर्त
प्रतिसाद
नांदेड
दि. 15 ऑगस्ट :- केंद्र व राज्य शासनाच्या “हर घर तिरंगा” अभियानाला नांदेड जिल्ह्यामध्ये
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. शहराच्या छतावर तिरंग्याचे राज्य तर वाहने,
इमारती, धरणे, प्रकल्प, सभागृह सगळ्यांच्या शिरपेचात तिरंग्याने गेली तीन दिवस
आपले स्थान निश्चित केले होते.
राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हर घर तिरंगा अभियान” घराघरात मनामनात राबविण्याचे आवाहन
केले होते. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर या काळात तिरंगा
अभिमानाने फडकत होता. ध्वजसंहितेमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक घरांमध्ये, कार्यालयामध्ये
तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सजावट करण्यात आली.
15
ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य समारोहामध्ये प्रवेशद्वारावरील
भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या 2
दिवसांपासून तिरंगी प्रकाशझोताने सजविण्यात आले होते. रात्री या इमारतीच्या
सौंदर्यात अप्रतिम भर पडली. नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय इमारती अशाच
प्रकारे सजविण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने आपले महत्त्वपूर्ण प्रकल्प 3
रंगाच्या प्रकाशझोतात झळकविले आहे. नांदेड येथील विष्णुपूरी येथील अंतर्गत उपसा जलसिंचन
प्रकल्प स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला आकर्षनाचे केंद्र बनला होता. पाटबंधारे विभागाने
जिल्ह्यातील अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांना “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत आकर्षक पद्धतीने सजविले आहे. नांदेडचे हुजूर साहिब
रेल्वेस्थानक, जिल्हा परिषद आदी इमारतींवरील रोशनाई लक्षवेधी ठरल्या आहेत.
0000
No comments:
Post a Comment