Wednesday, July 17, 2024

वृत्त क्र. 602 दि. 16 जुलै 2024

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नांदेड ग्रामीणमध्ये ९० हजारावर अर्ज दाखल

चावडी वाचन करताना त्रुट्या लक्षात आणून द्या

गावागावांमध्ये कॅम्पचे सुरू आहे आयोजन

नांदेड दि. १६ जुलै : महिला सबळीकरणाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑनलाइन २९ हजार ६१३ तर ऑफलाइन ६०हजार ०५३
एकूण ८९ हजार ६४७ हजार महिला भगिनींनी आपले अर्ज दाखल केले आहे.

गाव पातळीवरील समितीच्या मार्फत अर्ज स्वीकारणे सुरू असल्याने अर्जामध्ये वाढ होत आहे. पिवळी व केशरी पत्रिका असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींचे अर्ज भरायचे असल्यामुळे सर्व यंत्रणेने गतिशील व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. 

जिल्हा पातळीवर सध्या दररोज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी सुरू असून पंधरा दिवसात झालेल्या कामाचा आढावा आज घेण्यात आला. पिवळी व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या सर्व महिलांचे अर्ज भरून घ्यायचे असल्यामुळे व त्यांना आधार कार्ड व्यतिरिक्त कुठलेही अन्य दस्तऐवज लागत नसल्यामुळे या महिलांचे अधिक अर्ज भरून घेण्याबाबत यंत्रणेने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दर शनिवारी होणाऱ्या चावडी वाचन दरम्यान त्रुटी असलेल्या अर्जांबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही सुचविण्यात आले आहे.
       
 दरम्यान, सर्वांना त्यांच्या खात्यावर पैसे दाखल करायचे असल्यामुळे आधार कार्ड नुसार माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नारीशक्तीदूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच अर्जात लिहावे.आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतंत भरावी, अशी सूचना ही सर्व यंत्रणेला देण्यात आली आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...