Monday, July 1, 2024

  वृत्त क्र. 545

पावसाळयात धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध

·          नदीपात्र परिसर, जलाशय, पूरपरिस्थीती पुलांवर, पर्यटन स्थळावर कलम 144  

नांदेड दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या अनुषंगाने नदीपात्र परिसर, जलाशय,  पूरपरिस्थीती पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे याठिकाणी  प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 1 जुलै 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.  

 

नांदेड जिल्ह्यात आगामी पावसाळयातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी सारख्या घटनेच्या वेळी नदीपात्र परिसरात, जलाशयावर, पूर परिस्थिती जन्य पुलावर, रस्त्यांवर तसेच पर्यटन स्थळांवर जावून गर्दी करणे तसेच छोटी वाहने घेवून जाणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे इत्यादी बाबींना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन प्रतिबंध करण्यात आला आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...