Monday, July 1, 2024

विद्यार्थ्यांनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता असलेल्या संस्थेतच प्रवेश घ्यावा - जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांची सूचना

 वृत्त क्र. 546

विद्यार्थ्यांनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास

मान्यता असलेल्या संस्थेतच प्रवेश घ्यावा

 - जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांची सूचना

नांदेडदि. 1 :- जिल्ह्यातील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी ज्या संस्थेत द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता आहेअशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यात यावा. ज्या संस्थेमध्ये या विभागाची मान्यता नाही. अशा संस्थेनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिल्यासत्यांचे प्रवेश नामंजूर करण्यात येतील अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. विद्यार्थी व पालकांनी मान्यताप्राप्त द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाची यादी व संस्था जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा सर्व संबंधितानी मान्यता यादी पाहून मान्यताप्राप्त संस्थेतच आपलाआपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावाअसे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. सद्यस्थितीत चालू असलेले +स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थाना एनएसक्यूएफ रुपांतरीत नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 पासून सुरु करण्याबाबत सर्व शासकीयअशासकीय अनुदानित व अशासकीय कायम विनाअनुदानित संस्थेमध्ये माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक व + स्तरावरील द्विलक्षी तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एनएसक्युएफ रुपांतरीत नवीन व्यवसाय अभ्यासक्रम चालू करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती. परंतु शासन निर्णयानुसार एनएसक्यूएफ रुपांतरीत नवीन अभ्यासक्रम शेक्षणिक सत्र 2024-25 पासून ऐवजी शैक्षणिक सत्र 2025-26 पासून सुरु करण्याबाबत स्थगिती देण्यात आलेली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...