Wednesday, July 24, 2024

 वृत्त क्र. 626

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड दि. 24 जुलै :- नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 335 चा होमगार्ड सदस्य अनुशेष  भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे.


यासाठी 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...