Thursday, June 13, 2024

 वृत्त क्र. 479 

परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि.13 : सन 2024-25 मध्ये अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गत विद्यार्थ्याकडून दि.12 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासन निर्णय दि.30 ऑक्टोंबर 2023 अन्वये विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...