Thursday, June 13, 2024

 वृत्त क्र. 476 

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा

कृषी विभागाचा सोप्या सूचनांसह शेतकऱ्यांना सल्ला

 

नांदेड दि. 13 : गुलाबी बोंड अळीने अख्खी कपाशी वाया जाण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळी येणारच नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बोंड अळी पासून संरक्षित असलेल्या व कृषी विभागाने शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी वाणांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतामध्ये बीटी कापसाच्या पूर्ण प्लॉट शेजारी नॉन बीटीची थोड्या प्रमाणात लागवड करण्याची सूचनाही कृषी विभागाने केली आहे .जमिनीत पूर्ण ओलावा आल्याशिवाय पेरणीला हात घालू नये असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नत्र खताचा वापर न करता जमिनीची पत तपासून ( मृदा परीक्षण ) खतांचा वापर करण्याची सूचना केली आहे.

 

कृषी विभागाने काही सूचना व प्रायोगिक तथ्य शेतकऱ्यांना सांगितले असून जिनिंग मध्ये किंवा साठवलेल्या कापसामध्ये किडीचा जीवनक्रम अखंडित सुरू असतो हे लक्षात घेण्याचे स्पष्ट केले आहे. जिनिंग प्रेसिंग तसेच गोडाऊन मधील स्वच्छता व कीड नियंत्रण याकडे लक्ष देणे ही आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे तसेच बोंड आळी साठी फेरोमन सापडे लावून अळ्या व कोष नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

एका गावात एकाच वानाची लागवड झाल्यास किड नियंत्रण आणखी सोपे होत असल्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. कापूस पिकाचे फरदड घेऊ नये काही ठिकाणी शेतात उभे असलेल्या कापूस पिकामध्ये शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत पराठ्यांचे लहान लहान तुकडे करून ते शेतात काढावेत किंवा त्याचा वापर शेताबाहेर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करावा ,असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...