वृत्त क्र. 299
निवडणुकीच्या काळातील वृत्तांकनाची पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती
नांदेड दि. 2 – एमजीएम महाविद्यालयाच्या एमजे एमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोग तसेच प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाला अपेक्षित असणारे वृत्तांकन व माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत या काळात होणारी देखरेख यासंदर्भातील माहिती माध्यम कक्षाला भेट देवून जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माध्यम कक्ष स्थापन
करण्यात आला आहे. याठिकाणी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, ऑडीयो व सोशल मिडीयाचे संनियंत्रण केले जात आहे. माध्यम कक्ष आणि निवडणुकीचे कव्हरेज हे
पत्रकारांसाठी अत्यंत महत्वाचे कार्य आहे. सध्या लोकसभेची आदर्श आचारसंहिता
सुरु असून निवडणूक प्रक्रियेबाबतची अचूकता
राहावी व प्रशासनामार्फत द्यावयाची सर्व माहिती माध्यमांना वेळेत देण्यासाठी
माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जाहिरातीच्या
मजकुराला प्रमाणित करणे, प्रिंट माध्यमात येणा-या जाहिराती व मजकूर पेडन्युज तर नाही यावर देखरेख, इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मिडीयावर येणा-या आक्षेपार्ह वृत्तांकडे लक्ष ठेवणे
ही कामे माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत केले जातात. पत्रकारितेची
पदवी घेणा-या विद्यार्थ्यांनी या बाबीची प्रक्रीया व माहिती जाणून घेतली.
काल माध्यम कक्षाची माहिती घेण्यासाठी एमजीएम महाविद्यालयाचे एमजे एमएस या पदवीस शिक्षण घेणारे विद्यार्थी -विद्यार्थी यांनी भेट देवून माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी माधव जायभाये, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे तसेच मिडीया कक्षाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती यावेळी होती.
यावेळी सर्व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना माध्यम
कक्षाबाबत चालणा-या कार्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी
दिली. सोशल मिडीयावरील संनियंत्रण, फेकन्युज, वृत्तपत्राच्या जाहिरातीना परवानगी
याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
0000
No comments:
Post a Comment