Monday, April 1, 2024

वृत्त क्र. 296

 सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे

उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड दि. १ :  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80 % च्यावर मतदार मतदान करतील हे उद्दिष्ट ठेवून युवकयुवती व  नागरिकांच्या सहभागातून यापूर्वी मतदान कमी झाले आहे अशा क्षेत्रात  सर्व लोकमाध्यमे,सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष संवादातून मतदानाचा टक्का वाढवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज स्वीपच्या बैठकीत केले.  ‍

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप कक्षाच्या सदस्यांची आज बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी गाव व तालुकास्तर या ठिकाणी स्वीप कक्षाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित तालुक्याचे प्रमुखतहसीलदारगटशिक्षणाधिकारी आणि संबंधित सदस्यांनी दिली.

 

 नागरी मतदार मतदान करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे या सादरीकरणांमध्ये दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी मतदान अत्यंत कमी झाले अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्या त्या ठिकाणी आयोजित करावयाचे कार्यक्रमलोकमत अनुकूल करणे,माध्यमांचा वापरप्रत्यक्ष भेटीगृह संवाद अशा विविध उपक्रमातून कक्षाचे सदस्य कार्य करीत आहेत.

 

देगलूरभोकर ,नांदेड ,कंधारलोहामुखेडकिनवट ,माहूर या तालुक्यांनी आपापल्या तालुक्यात करीत असलेल्या कामाचे सादरीकरण केले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे ,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगरयोजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शालेय विद्यार्थीकनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सहभागाबद्दल माहिती दिली.


मतदार जनजागृती मोहिमेत किनवटचे प्राध्यापक शाहीर मार्तंड कुलकर्णी यांनी दुर्गम भागातील गावांना भेट देऊन जनसंवाद कार्यक्रम आखला आहेयाची माहिती दिली.असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुट्टी देण्याबाबत संबंधित आस्थापनांच्या मालकांना भेटून विनंती केली आहे. स्थलांतरामुळे जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना गावात आणण्यासाठी उपाययोजना सहायक जिल्हाधिकारी किनवट करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीवरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात येत आहे. प्रतिज्ञारिंगणपथनाट्य आई-बाबांना संकल्प पत्र ,भटक्यांच्या पालांच्या ठिकाणी भेटीलग्नकार्यात आवाहनमंदिरात आवाहनसामाजिक माध्यमेपथनाट्यछोटे छोटे व्हिडिओ तयार करून रंजकपणे माहिती देणे घोषवाक्य आदी तयारी करण्यात येत आहे. 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

 नव मतदार युवक युवती मतदान करण्यासाठी उत्साहीत असतात. त्यांच्यातील उत्साहाला आपण सर्वांनी बळ द्यावे. यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालय ,वरिष्ठ महाविद्यालयविविध शैक्षणिक संस्थातरुणांचे सामाजिक संघटन आदींना यात सहभागी करून घ्यावे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यप्राध्यापक यांचा यामध्ये सहभाग घेऊन मतदान वाढविता येईल.  

 

महेश कुमार डोईफोडे महानगरपालिका आयुक्त        

शहरातील डॉक्टर्सलायन्स क्लबवेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मतदान जनजागृती अभियानात समाविष्ट करून घेण्यात येत आहे. मतदान करणाऱ्या रुग्णांना डॉक्टरची ट्रीटमेंट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या दवाखान्यात तशाच सोयी करण्याबाबत प्रयत्न आहेत. महानगरपालिका पातळीवर सर्व बाबतीत जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

0000







No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...