Tuesday, February 20, 2024

 वृत्त क्र. 146 

राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात

मार्च 2024 रोजी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई  व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे दिनांक मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणेदिवाणी प्रकरणेमोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणेभुसंपादन प्रकरणेधनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणेतसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्या योग्य प्रकरणेग्राहक तक्रार निवारण मंचसहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता करथकीत विद्युत बिलथकीत टेलीफोन बिलविविध बॅंकांचे कर्ज वसुली प्रकरणथकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आाहेत.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाहीप्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फी  रक्कम 100 टक्के परत मिळतेनातेसंबंधात कटुता निर्माण होत नाहीअशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभजलद व मोफत न्याय मिळतो.  सर्व पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक मार्च 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा  लाभ घ्यावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...