अनुकंपा नियुक्ती ची तात्पुरती प्रतीक्षा सूची संकेतस्थळावर प्रसिध्द
· 26 फेब्रुवारी पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 14 :- शासन सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-अ ते गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील पात्र वारसास त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती ची योजना कार्यान्वित आहे. या योजनेतर्गंत नांदेड जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्याच्या ज्या वारसांनी 31 डिसेंबर 2023 अखेर जिल्हा परिषदेकडे विहित प्रस्ताव सादर केलेले आहेत, अशाच उमेदवारांचे प्रस्ताव शासन निर्णयातील तरतुदीनुसार व अर्जासोबत सादर केलेल्या परिपूर्ण कागदपत्रांच्या पडताळणीनुसार प्रतीक्षासूचीमध्ये नाव समाविष्ट करुन तात्पुरती प्रतीक्षासूची जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांची पात्र प्रतीक्षासूची व ज्या उमेदवारांनी अपूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहेत, अशा उमेदवारांची अपूर्ण यादीतील प्रतीक्षासूचीचे अवलोकन उमेदवारांनी करावे. तसेच त्यांच्या नावासमोरील माहितीबाबत काही आक्षेप वा हरकती असल्यास तसेच ज्या उमेदवारांची नावे या प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट झाली नसल्यास अशा उमेदवारांनी त्याच्या हरकती 26 फेब्रुवारी 2024 पर्यत कागदोपत्री पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर करावी. तात्पुरत्या प्रतीक्षासूचीबाबत विहित मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती आक्षेपाची छाननी करुन, तात्पुरती प्रतीक्षा सूची अंतिम करुन त्यानुसार अनुकंपा पदभरतीबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment