Wednesday, February 14, 2024

वृत्त क्र. 130

 आजपासून नांदेडच्या महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ

·         जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस कवायत मैदानाची पाहणी

·         प्रवेश निःशुल्क कुटुंबासह महासंस्कृती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

·         शिवकालीन विविध मैदानी खेळाचा सकाळी १० ला प्रारंभ  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शिवकालीन विविध मैदानी खेळांचा सहभाग असणारा नांदेडचा महासंस्कृती महोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. आपले वेगळेपण जपणारा हा महोत्सव राज्यातील लोकप्रिय कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. प्रवेश नि:शुल्क आहे. त्यामुळे कलाक्रीडासांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाच दिवसाचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने नांदेड येथे 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजपर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदया 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

राज्याचे ग्रामविकासपंचायत राजपर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून या महोत्सवाचे आयोजन होत आहे.

या महासंस्कृती महोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या महासंस्कृती महोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजन भवन येथे आज बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेउपविभागीय अधिकारी विकास मानेउपविभागीय अधिकारी अरुणा संगेवारप्रकल्प संचालक संजय तुबाकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटीलउपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसेजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुलेप्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेसहायक आयुक्त रेणूका तम्मलवार व विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य आदीची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पोलीस कवायत मैदानाची पाहणी केली.

सिने व नाट्य कलावंताचा सहभाग

या महासंस्कृती महोत्सवात शिवकालिन व पारंपारिक मैदानी खेळविविध स्पर्धागीतनृत्यलोकगीतआदिवासीचे पारंपारिक लोकनृत्याचे प्रकार इत्यादीची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. तसेच सुप्रसिध्द सिने व नाटय कलाकारांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. *शिवकालीन मैदानी खेळ वैशिष्ट्य* आज प्रारंभ होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते या कालावधीत शिवकालिन विविध मैदानी खेळांचे आयोजन पोलीस कवायत मैदानपोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागे करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांना याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

प्रवेश नि:शुल्क 

महासंस्कृती महोत्सवासाठी सर्व कार्यक्रम स्थळी प्रवेश निशुल्क आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कुटुंबासह यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आजचे कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावरील शिवकालीन व पारंपारिक मैदानी खेळाणे होणार आहे. खो -खो,कबड्डीलेझीमकुस्तीमलखांबआट्यापाट्याघुंगुर काठीलाठी-काठीरस्सीखेचगतकालगोरी इत्यादी विविध खेळांचे प्रात्यक्षिक स्पर्धात्मक स्वरूपात होणार आहे.नागरिकांनी यासाठी उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे. 16,17, 18 फेब्रुवारी रोजी रात्री सहा ते दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

00000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...