Sunday, December 10, 2023

 पनवेल महानगरपालिका पदाच्या विविध पदासाठी परीक्षा संपन्न

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट अ ते ड मधील एकूण 41 संवर्गातील 377 पदांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एकुण 55 हजार 214 एवढे उमेदवार परीक्षा देत आहेत. ही परीक्षा टि.सी.एस कंपनी मार्फत घेण्यात येत आहे. 

आज 8 डिसेंबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हयातील आयऑन डिजीटल झोन आयडीझेड विष्णुपुरी व संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आणि टेक्नालॉजी नांदेड  या परीक्षा केंद्रावर एकूण दोन/तीन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती.  पहिले सत्र सकाळी 9 ते 11, दूसरे सत्र  दुपारी 1 ते 3 व तिसरे सत्र सायं. 5 ते 7 अशा स्वरुपात ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये एकुण 1 हजार 181 एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता. 

परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपिक व एक शिपाई नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या केंद्रावर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. 

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये याबाबत योग्य ती दक्षता घेणेसाठी, शासन मान्यताप्राप्त मे. ई. सी. आय. एल. (ECIL) या कंपनीची प्रत्येक परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आलेले होते. या परीक्षेसाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांनी मेहनत घेतली असुन त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसून परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली आहे असे नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...