खाजगी वृध्दाश्रम चालकांनी शासनासोबत चर्चा करण्याचे आवाहन
लातूर, दि.20 (विमाका) : वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालवता यावा याकरिता शासनाने फेब्रुवारी 1963 मध्ये राज्यातील वृध्दांसाठी मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर खाजगी संस्थांमार्फत सुध्दा विनाअनुदानित वृध्दाश्रम कार्यरत आहेत. लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील खाजगी विनाअनुदानित वृध्दाश्रमांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनासोबत चर्चा (सहविचार) करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अ.र. देवसटवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.अधिक माहितीसाठी 02385-255378 या क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
No comments:
Post a Comment