Tuesday, August 22, 2023
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 22 :- मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण गटातील व अनुसूचित जाती, जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पेपर बॅग मेकिंग, डेटा एंट्री ऑपरेटर, इन्व्हर्टर रिपेरिंग, बनाना चिप्स मेकिंग, मोबाईल रिपेरिंग, मोटार रिवाइंडिग, टू व्हीलर रिपेरिंग इत्यादी वर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
प्रशिक्षण प्रवेशासाठी किमान सातवी पास, वय 18 ते 45 असावे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी निवड करताना अपंग, महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, भूमिहिन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छूकांनी सर्व कागदपत्र नांदेड येथे मिटकॉन कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मिटकॉनचे जिल्हा समन्वयक आर.एस. दस्तापुरे यांनी केले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
महत्वाचे / संदर्भासाठी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...
No comments:
Post a Comment