Friday, April 28, 2023

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याला युवकांनी प्राधान्य द्यावे - आमदार राजेश पवार

 स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याला युवकांनी प्राधान्य द्यावे

-         आमदार राजेश पवार

 

§  नायगाव येथील रोजगार मेळाव्यात 357 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी रोजगार मेळावे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींनी आपल्यातील कौशल्य ओळखून स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी केले. नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार, प्राचार्य व्ही. भोसीकर, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, माविमचे चंदनसिंग राठोड, तहसिलदार गजानन शिंदे, तहसिलदार डी.एन.शिंदे, आर.बी.गणवीर, रुपेश देशमुख, वसंतराव पालवे, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.  



यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांनी रोजगार मेळाव्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यात एकूण 15 नामांकित कंपन्या व 10 महामंडळानी सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्यात 357 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले. सुत्रसंचालन अशोक कानगूले यांनी तर आभार आर.बी. गणविर  यांनी मानले.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...