Friday, April 28, 2023

मालेगाव रोडवरील शिवनेरी व शौर्य ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 मालेगाव रोडवरील शिवनेरी व शौर्य ढाब्यावर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक ए.ए.कानाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव रोडवरील शिवनेरी ढाबा व शौर्य ढाबा येथे दारुबंदी कायद्यान्वये ढाबा मालक बालाजी व्यंकटी बोराटे व साहेबराव गंगाराम घाटोळे यांच्या विरोधात सार्वजनिक दारुचा गुत्ताबाबत व ढाब्यावर विना परवाना मद्य सेवन करणाऱ्या इतर 7 जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 25 एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली.

सदर ढाबा मालक व इतर 7 इसमाविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून अर्धापूर न्यायालयाने ढाबा मालक बालाजी व्यंकटी बोराटे व साहेबराव गंगाराम घाटोळे यांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि इतर 7 विना परवाना मद्य सेवन करणाऱ्या इसमाना प्रत्येकी 500 रु. प्रमाणे 3 हजार 500 असे एकूण 53 हजार 500 रुपये एवढया द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर दंडाची रक्कम भरणा करण्यात आली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कळविण्यात आले आहे.  

ही कार्यवाही निरीक्षक एस.एस.खंडेराय, ए.एम.पठाण व दुय्यम निरीक्षक के.जी.पुरी, एस.डी. दुय्यम निरीक्षक राजगुरु, दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले, दुय्यम निरीक्षक मो. रफि, बालाजी पवार जवान, रेनके, दासरवार, नांदुसेकर, इंगोले, अन्नकाळे, नारखेडे व वाहनचालक बोधमवाड यांनी केली.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...