Friday, April 28, 2023

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठाबाबत कार्यशाळा संपन्न

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठाबाबत कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा निमित्त 27 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना व अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठाबाबत कार्यशाळा संपन्न झाली.

 

या कार्यशाळेचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर हे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरीसहाय्यक लेखाधिकारी डी.वाय.पतंगेकार्यालय अधिक्षक आर.व्ही. सुरकुटलावार,  आर.डी.सुर्यवंशीडी.जी.कदम, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड यांची उपस्थिती होती.

 

या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या लाभार्थी व नागरीकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना व अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेची सखोल माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर  यांनी दिली. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यशाळेचे सुत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक आर.एल. नागुलवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यालयातील के.एम.ताकतोडे, डी.आर. दवणे, के.पी. जेटलावार, श्रीमती यु.ए.वानुळे, पी.एम.दोंतूलवाडविठ्ठल बोराटे, विजय गायकवाडकैलास राठोडविजय माळवदकरसुदर्शन खराटेमहेश इंगेवाड व शशिकांत वाघमारेभगवान घुगे, रामदास पेंडकर यांनी प्रयत्न केले.

0000


मालेगाव रोडवरील शिवनेरी व शौर्य ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 मालेगाव रोडवरील शिवनेरी व शौर्य ढाब्यावर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक ए.ए.कानाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव रोडवरील शिवनेरी ढाबा व शौर्य ढाबा येथे दारुबंदी कायद्यान्वये ढाबा मालक बालाजी व्यंकटी बोराटे व साहेबराव गंगाराम घाटोळे यांच्या विरोधात सार्वजनिक दारुचा गुत्ताबाबत व ढाब्यावर विना परवाना मद्य सेवन करणाऱ्या इतर 7 जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 25 एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली.

सदर ढाबा मालक व इतर 7 इसमाविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून अर्धापूर न्यायालयाने ढाबा मालक बालाजी व्यंकटी बोराटे व साहेबराव गंगाराम घाटोळे यांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि इतर 7 विना परवाना मद्य सेवन करणाऱ्या इसमाना प्रत्येकी 500 रु. प्रमाणे 3 हजार 500 असे एकूण 53 हजार 500 रुपये एवढया द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर दंडाची रक्कम भरणा करण्यात आली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कळविण्यात आले आहे.  

ही कार्यवाही निरीक्षक एस.एस.खंडेराय, ए.एम.पठाण व दुय्यम निरीक्षक के.जी.पुरी, एस.डी. दुय्यम निरीक्षक राजगुरु, दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले, दुय्यम निरीक्षक मो. रफि, बालाजी पवार जवान, रेनके, दासरवार, नांदुसेकर, इंगोले, अन्नकाळे, नारखेडे व वाहनचालक बोधमवाड यांनी केली.

0000

 

लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

 लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतु या दिवशी सुट्टी असल्यामुळे लोकशाही दिन पुढील दिवशी म्हणजेच मंगळवारी 2 मे 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आयोजित केला आहे.

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनी कळविले आहे.

00000

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

 

·       ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 


नांदेड (जिमाका) दि. 28 :- राष्ट्रीय कार्यक्रममहत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करतानाभारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळामहाविद्यालयसंस्थासंघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रममहत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्यानेकार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानातरस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतातपायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेलेमाती लागलेले राष्ट्रध्वज मैदानातरस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेलेमाती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्थाइतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालयेअर्धशासकीय कार्यालयेस्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावीअसेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याला युवकांनी प्राधान्य द्यावे - आमदार राजेश पवार

 स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याला युवकांनी प्राधान्य द्यावे

-         आमदार राजेश पवार

 

§  नायगाव येथील रोजगार मेळाव्यात 357 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी रोजगार मेळावे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींनी आपल्यातील कौशल्य ओळखून स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी केले. नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार, प्राचार्य व्ही. भोसीकर, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, माविमचे चंदनसिंग राठोड, तहसिलदार गजानन शिंदे, तहसिलदार डी.एन.शिंदे, आर.बी.गणवीर, रुपेश देशमुख, वसंतराव पालवे, बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते.  



यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांनी रोजगार मेळाव्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यात एकूण 15 नामांकित कंपन्या व 10 महामंडळानी सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्यात 357 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले. सुत्रसंचालन अशोक कानगूले यांनी तर आभार आर.बी. गणविर  यांनी मानले.

0000

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन

 महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

·         वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 1 मे 2023 रोजी पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण  मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेतसर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

Wednesday, April 26, 2023

 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरीय

क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईच्यावतीने यशदा पुणे येथे 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

 

कार्यशाळेच्या उद्घाटन यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम व प्रमुख पाहूणे म्हणून औद्योगिक सांख्यिकी विभागाच्या उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, पुणे येथील राष्ट्रीय नमुना पाहणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोक कुमारउद्योग विभागाचे महाव्यवस्थापक प्रतिनिधी पी.डी.रेंदाळकर उपस्थित होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे सहसंचालक डॉ.किरण गिरगांवकर व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखिल बासटवार आणि क्षेत्रकाम करणारे कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते. एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले.

 

वार्षिक उद्योग पाहणी  हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (जीडीपीतयार करण्यासाठीऔद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येते.

 

निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या द‌ृष्टीकोनातून सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

 

जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येते.  आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती यांनी नमूद केले. तसेच माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले.

 

या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा. जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संचालक विजय आहेर यांनी दिल्या. तसेच उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

 

देशातील सर्व्हेचा इतिहासमाहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणासह उपस्थितांच्या ज्ञानात यशदाचे महासंचालक चोकलिंगम यांनी भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यशाळेत कोलकाता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक रणबीर डे व बाप्पा करमरकरडॉ. प्रदीप आपटेप्रख्यात अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक गोखले, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अपर संचालक डॉ.जितेंद्र चौधरी हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमासाठी यशदा पुण्याचे उपमहानिदेशक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी हे अध्यक्ष व अपर

संचालक पुष्कर भगूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

00000



 पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंघ बादल

यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा दुखवटा   

नांदेड (जिमाका) दि. 26 :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंघ बादल यांचे दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी दु:खद निधन झाले आहे. दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी 2023 रोजी संपूर्ण देशात दोन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. 26 व 27 एप्रिल 2023 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

00000

 सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्याचे उदबोधन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 26 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

 

सामाजिक समता पर्वानिमित्त 25 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उदबोधन शिबिराचे आयोजन कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर व  मार्गदर्शक समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी हे होते.

 

या शिबिरात कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालय अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित कर्मचारी यांना संभाषण कौशल्य, अभ्यंगता सोबतचे वर्तन व योजनाच्या माहितीवर आधारित मार्गदर्शन समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी केले.

 

अध्यक्षीय समारोपात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचे कौतूक करुन पुढील वार्षिक कामकाजाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक राजेश सुरकूटलावार तर सुत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी मानले.

0000

Tuesday, April 25, 2023

 

District Information Office Nanded dionanded23@gmail.com

12:23 PM (0 minutes ago)
to vinod

नायगाव येथे 27 एप्रिल रोजी बेरोजगार

युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे 27 एप्रिल 2023 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे सकाळी 10 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462) -251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...