Wednesday, April 26, 2023

 सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्याचे उदबोधन शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 26 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

 

सामाजिक समता पर्वानिमित्त 25 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उदबोधन शिबिराचे आयोजन कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर व  मार्गदर्शक समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी हे होते.

 

या शिबिरात कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालय अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित कर्मचारी यांना संभाषण कौशल्य, अभ्यंगता सोबतचे वर्तन व योजनाच्या माहितीवर आधारित मार्गदर्शन समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी यांनी केले.

 

अध्यक्षीय समारोपात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचे कौतूक करुन पुढील वार्षिक कामकाजाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक राजेश सुरकूटलावार तर सुत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी मानले.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...