Monday, March 13, 2023

वृत्त क्रमांक 121

 निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

योजनेतर्गत प्रशिक्षण संस्थेची निवड

नांदेड (जिमाका) दि. 13 :- .अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मुंबई यांच्या शासन निर्णय 2 मार्च 2023 अन्वये वर्ष 2022-23 मध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजातील तरुणांसाठी तीन महिन्‍यांचे निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग नांदेड जिल्‍ह्यात चालविण्‍यास विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण क्रीडा, सांस्‍कृतिक सामाजिक, व्‍यायाम प्रसारक मंडळ, वजिराबाद नांदेड या संस्‍थेस मंजुरी प्रदान करण्‍यात आली आहे.

या संस्‍थेमार्फत प्रशिक्षण वर्ग घेण्‍यात येणार असून, शासन निर्णयातील दिलेल्‍या सूचनांनुसार, इच्‍छुक तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतलेल्‍या आणि शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या इच्‍छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेण्‍याची कार्यवाही संबंधीत संस्‍थेमार्फत राबविण्‍यात येत आहे. तरी जिल्‍ह्यातील अल्‍पसंख्‍यांक समाजातील इच्‍छुक उमेदवारांनी शासनाच्‍या या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी संबंधीत संस्‍थेस (विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण क्रीडा, सांस्‍कृतिक सामाजिक, व्‍यायाम प्रसारक मंडळ, वजिराबाद नांदेड-अध्‍यक्ष-विक्रांत खेडकर-मो.क्र.८३७९०६३९९९यांच्याकडे संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...