Monday, January 16, 2023

 विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत

उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक

                   औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुक लढविणाऱ्या उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आज झाली.

                   औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी व मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी ही बैठक झाली.

                   उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनियार उपस्थित होते.

                   शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, नियमावली, मतदान, मतमोजणी, तारखा व वेळा, मतदार यादी, प्रचार साहित्य छपाई निर्बंध, मतदान केंद्रे, उमेदवार तसेच प्रतिनिधीचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे निर्देश, आदींबाबत श्री.केंद्रेकर यांनी माहिती दिली. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. माहितीसाठी मार्गदर्शिकेचेही वितरण यावेळी करण्यात आले. 

*****







No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 48 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदानासाठी मुख्याध्यापकांना महाडिबीटी द्वारे अर्ज भरण्याचे आवाहन  नांदेड दि. 14 ज...