Monday, November 21, 2022

 गहूज्वारीहरभरा पिकासाठी पिक विमा भरण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के असा मर्यादीत आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग,  विज कोसळणे,  गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागु आहे. 


या योजनेअंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे. पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी तर विमा लागु असलेले तालुके व पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख पुढील प्रमाणे आहे. 

गहु (बा.) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 42 हजार 500 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी  637.50 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, दगाव आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 राहिल. 


ज्वारी (जि) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 33 हजार 750 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 506.25 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेडदेगलूरनायगावबिलोलीमुखेडधर्माबादकिनवटहदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 राहिल. 

हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 37 हजार 500 रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 562.50 आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेडअर्धापूरमुदखेडबिलोलीलोहाकंधारदेगलूरनायगावधर्माबादमुखेडकिनवटमाहूरहिमायतनगरभोकरहदगावउमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 राहिल. 


ही योजना युनाईटेड इंडिया जनरल इंशुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी 30 नोव्हेंबर 2022 असून गहू बा. व हरभरा पिकासाठी  15 डिसेंबर 2022 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...