Monday, November 21, 2022

 वेतन पडताळणी पथक औरंगाबाद कार्यालयात वेतन पडताळणीचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- वेतन पडताळणी  पथकाने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये वेतन पडताळणी पथक कार्यालय औरंगाबाद येथे दौरा कार्यक्रमाचे आयोज केले आहेअसे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. हे पथक शनिवार 26 नोव्हेंबर ते बुधवार 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयाच्या सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करील. 

 

सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालयातील 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी/कर्मचारी यांची मूळ सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राधान्याने दाखल करावीत. वेतन पडताळणीस सेवापुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र (चेक लिस्ट) प्रमाणे परीपूर्ण पुर्तता करुन संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना शा.नि.वि.वि.दि.14.05.2019 नुसार वेतनिका प्रणाली मार्फत वेतन पडताळणी पथकाकडे सादर करावे. त्याशिवाय मूळ सेवापुस्तके स्विकारली जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. अधिकारी/कर्मचारी यांनी सेवाजेष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबध्द /आप्रयोचा लाभ दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांचे मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे.

 

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...