फेसलेस सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 29 :- केंद्र शासनाच्या 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पध्दतीने देण्याचे सूचित केले आहे. यामध्ये सारथी संबंधी अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्यावत करणे, अनुज्ञप्ती ची माहिती मिळविणे, अनुज्ञप्ती विवरणपत्र, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती व कंडक्टर अनुज्ञप्ती नुतनीकरण या सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार आधार क्रमांकाचा वापर करुन नागरिकांना सारथी 4.0 या प्रणालीवर अर्ज करता येतील. यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे केलेला ऑनलाईन अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर वैध असलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment