मागासवर्गीय
विकास महामंडळाच्या
योजनेसाठी संपर्क करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 31 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील
लोकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत
इतर मागासवर्गीयाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी
/ विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील
व्याजाचा परतावा करणे बाबतची योजना राबविण्यात येत आहे.
इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या
दूरध्वनी 02462-220865 क्रमांकावर किंवा
अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट
द्यावी, असे आवाहन जिल्हा
व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी
केले आहे.
अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व
परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात
येईल. विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे
असावे. तो इमाव प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे
कौटुबिंक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयापर्यंत असावी. अर्जदार इयता 12 वी मध्ये
60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान
60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उतीर्ण असावा.
केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये
प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अर्जदार कोणत्याही वित्तिय संस्थेचा,
बँकेचा थकबाकीदार नसावा. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास
वितरित केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय
वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment