वृत्त क्र. 829
नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 85 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 2 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 436 एवढी झाली असून यातील 1 लाख 730 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 6 असे एकूण 14 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित
व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 703
एकुण
निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 840
एकुण
पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 436
एकूण
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 730
एकुण
मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर
बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब
तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब
नाकारण्यात आलेली संख्या- 01
आज
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात
उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14
आज रोजी
अतिगंभीर प्रकृती असलेले-00
00000
No comments:
Post a Comment