Thursday, September 22, 2022

 सेवा पंधरवड्यात विद्यार्थ्यांना शाळेत

मिळणार विविध प्रमाणपत्रे


नांदेड (जिमाका) दि. 22 :- सर्वसामान्यांची कामे विहित वेळेत होण्याच्या दृष्टीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने देगलूर व मुखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महसुल विभागामार्फत देण्यात येणारे उत्पन्न, जात, नॉन क्रिमीलेअर, रहिवासी, ईडल्ब्लुएस अशी विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत, असे देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले आहे.

या काळात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमध्येच जात प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्रात उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ईडल्ब्लुएस प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांनी संकलित करावीत. यात विद्यार्थ्यांचे मतदान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड, शेती असल्यास सातबारा व होल्डीग, टि.सी किंवा प्रवेश निर्गम, 10 वीची सनद, लाभार्थी 18 वर्षाखालील असल्यास वडीलांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, तहसिलदार यांनी दिलेले रहीवासी प्रमाणपत्र, नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र किंवा मानीव दिनांक पुरावा. वडीलांचे कागदपत्रात –आधारकार्ड, मतदान कार्ड, तीन वर्षाचे उत्त्पन्न प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. सर्व शाळांमधील संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांनी 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्व कागदपत्रे संकलित करुन शाळेजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी  माधव कांबळे यांचा मो. क्र. 8482878288 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले  आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...