मुलांच्या निरीक्षणगृहात वाचनालयाचा शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 9 :- मुलांनी पुस्तकांचे वाचन करून स्वत:मध्ये
सुधारणा करावी. आपल्या जीवनात कोणतेही वाईट कृत्य करू नये, असे प्रतिपादन डॉ.
शालीन इटनकर यांनी केले. नांदेड येथील मुलांचे निरिक्षणगृह येथे त्यांच्या हस्ते
आज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला
व बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे हे होते. वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन
करावे, असे आवाहन मिलिंद वाघमारे यांनी केले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष व
सदस्य, मुलांचे निरीक्षणगृहाचे अधीक्षक एस. के. दवणे, परिविक्षा अधिकारी एस. आर.
दरपलवार, गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या अळणे आदी
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपअधिक्षक सतिश हिवराळे यांनी केले तर
शेवटी आभार अधिक्षक दवणे यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment