पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमीत्त शेतकरी दिन संपन्न
नांदेड (जिमाका), दि. 11 :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा स्तरावर शेतकरी दिन कार्यक्रम आत्मा कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रगतशिल शेतकरी प्रशांत तिर्थे, सुरेश श्रीराम पावडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर तसेच सिजेंटा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी विनोद राऊत यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घेउन तंत्रज्ञान आधारित शेती करावी. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा), प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिर्वतन (स्मार्ट) प्रकल्प यामधून जास्तीत जास्त गट, कंपनी व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी मार्गदर्शन करतांना केले.
सिजेंटा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी विनोद राऊत यांनी भाजीपाला बिजोत्पादन बद्दल माहिती दिली. त्याच प्रमाणे प्रमुख पाहूणे प्रगतशील शेतकरी प्रशांत तिर्थे, सुरेश श्रीराम पावडे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करुन आपल्या उत्पादनात वाढ करावी, असे सांगून शेतकरी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामध्ये धनुका कंपनीचे राजेंद्र ढाले यांनी किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन कंपनी मार्फत फवारणी संरक्षण किट उपस्थित शेतकऱ्यांना वाटप केली. कार्यक्रमास स्मार्ट प्रकल्पाचे अरुण घुमनवाड, विशाल बि-हाडे, राहूल लोहाळे, अभिषेक व्हटकर, नांदेडचे मंडळ कृषि अधिकारी श्री सावंत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) चंद्रशेखर कदम तसेच नांदेड तालुक्यातील सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय कृषि अधिकारी एस. बी. मोकळे यांनी केले. प्रस्तावनामध्ये त्यांनी पद्मश्री डॅा. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची ओळख करुन दिली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृषि सहाय्यक सी. एल. भंडारे यांनी केले तर आभार माधव चामे यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment