Thursday, July 7, 2022

 धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील

नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू   

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2022-23  मध्ये शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढील प्रमाणे आहेत. ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कुल देगलूर येथे 100 विद्यार्थ्यांची संख्या. गोदावरी मनार पब्लिक स्कुल, शंकरनगर, बिलोली येथे 250 विद्यार्थी संख्या तर लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कुल नायगाव (खै.) जि.नांदेड येथे 150 विद्यार्थी संख्या आहे. या शाळेमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी परिपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...