अक्षय्य तृतीया मुहूर्तावर होणारे
बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नांदेड, (जिमाका) दि. 2 :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह
लावण्याची काही ठिकाणी पद्धत असते. याला आळा घालण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक
अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. बालविवाह हा अजामीन पात्र
गुन्हा आहे. अशा विवाहांना आळा घालण्यासाठी व कायदेशिर कारवाई करण्यासाठी जिल्हा
प्रशासनाने दक्षता व योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी डॉ.विपीन
इटनकर यांनी दिली.
बालविवाह जिल्ह्यात होऊ नये यासाठी महिला व
बालविकास संरक्षण अधिकारी, संबंधित
विभाग यांना याबाबत त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बालविवाह
जर कुठे आढळून आल्यास नागरिकांनीही पुढे येऊन याबाबत प्रशासनाशी संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी
डॉ.विपीन इटनकर यांनी केले.
बालविवाह होऊ नयेत यासाठी जाणीव जागृती
कार्यक्रम, प्रशिक्षण इत्यादी प्रतिबंधात्मक
उपाययोजना कराव्यात , अशा
सूचनाही त्यांनी दिल्या.
०००००
No comments:
Post a Comment