Monday, May 2, 2022

एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात

आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 2:- जिल्हा रुग्णालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था विष्णुपुरी नांदेड येथे आरोग्य तपासणी लसीकरण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी कर्मचारी मिळून 65 जणांची आरोग्य तपासणी 40 जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना तिवारी, डॉ. राजाराम कोळेकर व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. उमेश मुंडे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थी कर्मचारी यांचे बीपी, शुगर, मौखिक आरोग्य तपासणी केली. तर अधिपरिचारिका जयश्री वाघ, प्रियंका झगडे, कल्पना बटेटेवाड, धनंजय देशमुख  यांनी 40 विद्यार्थी कर्मचारी यांचे कोविड लसीकरण केले.

हे शिबीर संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिरास एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. माधव वैद्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे सचिव राहुल गुंडूले रा. से. यो. चे विध्यार्थी प्रशांत दुधमल, ओंकार डोहरे, जुई कदम, हेमंत खांडगावकर यांचे सहकार्य लाभले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...