Thursday, April 14, 2022

वृत्त

 सामाजिक समता सप्ताह निमित्ताने विशेष मोहिमेअंतर्गत

जात पडताळणी समिती नांदेड यांच्यावतीने 751 डिजिटल जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

आयुक्त, समाज कल्याण पुणे व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सूचनेनूसार सामाजिक समता सप्ताह निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांच्यावतीने दिनांक 6 ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. तसेच जातीदावा प्रकरणे तालुकास्तरावर स्विकारण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड येथे अर्जदारांना मोठ्या प्रमाणात डिजिडल जात वैधता प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व समितीचे सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

 

यावेळी श्रीमती सुनिता शिंदे (पोलीस निरीक्षक), मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, बालाजी शिरगीरे, साजिद हासमी, वैजनाथ मुंडे, शिवाजी देशमुख, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, बाबु कांबळे, शंकर होनवडजकर इ. समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात अर्जदार व पालक उपस्थित होते.

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र वितरीत करता आले. त्यामुळे अर्जदार व पालकांचा विशेष मोहिमेच्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळाला. विशेष मोहिमेत ज्या अर्जदारांनी अद्यापही समितीस ऑनलाईन भरलेले अर्ज सादर केले नाहीत अशा अर्जदारांनी समितीस अर्ज तात्काळ सादर करावे. जेणे करून अर्जदारांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समितीस साईचे होईल, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्यावतीने करण्यात येत आहे.

0000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...