Tuesday, March 8, 2022

 विभागीय कृषि सहसंचालक यांनी

घेतला कृषि विभागाचा आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक लातूरचे विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात नुकतीच घेतली. या बैठकीत एमआयडीएच, आर.के.व्ही.वाय, कृषि यांत्रिकीकरण, ठिबक-तुषार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, गळीतधान्य या विविध योजनांचा खर्चाबाबतचा आढावा त्यांनी घेतला. शेतकऱ्यांना / लाभार्थ्यांना वेळीच अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा, उपविभाग तालुका व मंडळ स्तरावर जी मोकातपासणी, खर्च प्रकरणे निकाली काढावयाचे प्रलंबित आहेत ती प्रकरणे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले.

 

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे,   उपविभागीय कृषि अधिकारी रविकुमार सुखदेव, उपविभागीय कृषि अधिकारी डी. एम. तपासकर, एस. बी. शितोळे, तंत्र अधिकारी उल्हास रक्षे, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

 

तसेच खत वितरक कंपनीचे प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधींची बैठक श्री. दिवेकर यांनी घेतली. खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांच्या नियोजनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीस कृषि विभागातील अधिकाऱ्यांसह, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक श्री. भोर, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बी. बी. गिरी, खत वितरक कंपनीचे नामदेव भुदाडे, सचीन घाडगे, केदार काचावार,स्वप्नील संसारे, घोडके तसेच सीडस फर्टीलायझर, किटक असोसीएशन नांदेडचे अध्यक्ष मधुकर मामडे व इतर प्रतिनीधी शिवा मुरगवार, संजय सारडा हे उपस्थित होते.

000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...