“अनुभव लेखन कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी”
विषयावरील अनुभव लेखन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 15 :- नागरिकांमध्ये निवडणूक व त्यासंदर्भात जागृती व्हावी तसेच त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी. या हेतूने यावर्षी महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून “अनुभव लेखन कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी” या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या विषयाबाबतचे अनुभव, लेखन नागरिकांनी शुक्रवार 25 मार्च 2022 पर्यंत
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठवावे. मुख्य निवडणूक अधिकारी
यांच्या कार्यालयास प्राप्त होणाऱ्या निवडक अनुभव / लेखाचे पुस्तक तयार करुन ते
प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, महिला, सर्व सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment