व्यवसायकर दात्यांसाठी विलंब शुल्क माफी योजना
नांदेड (जिमाका) दि. 15 :- सर्व व्यवसायकर नोंदणी दाखला पीटीआरसी धारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत व्यवसायकर, व्यवसायकर ई-रिर्टन दाखल केले नसतील त्यांना व्यवसायकर कायदा-1975 अंतर्गत शासनाच्या अधिसूचनेनुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीचे ई-विवरणपत्र दाखल करावयाचे राहिले असल्यास ते आता विलंब शुल्काशिवाय गुरुवार 31 मार्च 2022 पर्यंत भरता येणार आहेत.
31
डिसेंबर 2021 चे सर्व ई-रिटर्न (ई-विवरणपत्र) देय कर व व्याज भरून विलंब
शुल्काशिवाय गुरुवार 31 मार्च 2022 पर्यंत दाखल करता येतील,
याची सर्व पीटीआरसी धारकांनी नोंद घ्यावी. यासाठी https://www.mahagst.gov.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा
व्यवसायकर अधिकारी गौ. म. स्वामी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment