Saturday, March 26, 2022

 रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पोलीस मुख्यालयात रस्ता सुरक्षा मार्गर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप या होत्या. 

या शिबिरात पोलीस मुख्यालयातील जवळपास 215 अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन, वाहन चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट, सिटबेल्टचा वापर आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पिपर खेडकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. मोटार वाहन निरीक्षक बालाजी जाधव व सर्वेश पानकर यांनी परिश्रम घेतले.

00000



 

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...