Saturday, March 5, 2022

अर्धापूर तालुक्यात राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 5 :- अर्धापूर तालुक्यात राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंता, पोलिस अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, युवक-युवती, खाजगी स्वरूपातील गायक, विविध संस्था समूह यांनी https://voterawarenesscontest.in/index.php या लिंक वर भेट देवून राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धत सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसिलदार  उज्वला पांगरकर यांनी केले आहे. 

राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानुसार व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यात राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन 15 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन केले आहे. "माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ" या विषयावर निवडणूक विषयी  ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येत आहे. 

या स्पर्धेत पहिले, दुसरे व तिसरे बक्षिसे तसेच ऑनलाईन ई-प्रमाणपत्र  ठेवून सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये निवडणूक विषयी जनजागृती करण्याबाबत  राष्ट्रीय स्तरावर भारत निवडणूक आयोगाने SVEEP अंतर्गत 5 घटकात प्रश्न मंजुषा, व्हीडीओ मेंकिग स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा, भित्तीचित्र (पोस्टर स्पर्धा), घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रेणी हौशी, व्यावसायिक, संस्थात्मक आदींना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्धापुर तहसिल कार्यालयात तहसिलदार श्रीमती उज्वला पांगरकर यांच्या अध्यक्षतेखाली  तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख उपस्थितीत गट विकास अधिकारी डी. एस. कदम, गटशिक्षणाधिकारी ससाणे व विविध विभातील अधिकारी उपस्थित होते. 

अर्धापूर तालुक्यात ही मोहिम यशस्वी करण्यासाठी समन्वय अधिकारी कर्मचारी म्हणून नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, डॉ. प्रा. रघुनाथ शेटे, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापुर, विस्तार अधिकारी (शिक्षण) जी. आर. राठोड, शिल्पनिदेशक कल्याणकर (शासकिय तंत्रनिकेतन), अभियंता अंनत मोरे (नगर पंचायत), विस्तार अधिकारी डॉ एस. पी. गोखले, केंद्र प्रमुख व्ही. बी. चव्हाण, शिवा कांबळे (मालेगाव), माधव कल्याणकर (हमरापुर), संतोष राऊत (कारवाडी), तानाजी मेटकर (मालेगाव), रामेश्वर सावते व गिरीष गलांडे (महसूल विभाग), बीएलओ तथा सहशिक्षक श्रीधर तांदळे (पिंपळगाव महादेव), राजेश्वर संगेवार (लोणी), धनंजय कुलकर्णी (पाटनुर), माने (पांगरी), एस. सी. कांबळे (येळेगाव), शिवकुमार स्वामी (लोणी), मकसुद पटेल लोहगावकर (उर्दू हायस्कूल अर्धापुर), तलाठी अनिल लोहटे, विजय गंदनवाड (नगरपंचायत  विभाग) आदींची विविध विभागांशी समन्वय साधून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

000000


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...