Wednesday, February 23, 2022

 दिव्यांग व्यक्तीच्या योजनांसाठी

आमिषास बळी न पडण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जातात. दिव्यांग अनुदान, दिव्यांग साहित्य, बीज भांडवल व दिव्यांग विवाह अनुदान व इतर दिव्यांग योजनाचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनांच्या लाभासाठी दिव्यांगाच्या पालकांना व दिव्यांग पाल्यांना कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनी संदेश किंवा प्रत्यक्षात आपणास लाभ मंजूर करुन देतो असे अमिष देत असेल तर त्यांच्या कोणत्याही थापाना बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे.  

याच बरोबर अशा भूलथापा देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती समवेत आर्थिक व्यवहार करु नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरापासून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरापर्यत अशा अज्ञात व्यक्तीकडून आमिष दाखविल्यास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा. याबाबची माहिती द्यावी किंवा कोणतीही माहिती असल्यास पत्त्यासह व दुरध्वनी संदेशासह तक्रार नोंदवावी, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...